आठ दिवसात कारवाई करा,अन्यथा मनसे स्टाईलने प्रकल्प हटवू…

286
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी पालिकेचा खत प्रक्रिया प्रकल्प वादात;शहरात पसरली दुर्गंधी…

सावंतवाडी ता.२९:

बाजारपेठेतील इंदिरा संकुल परिसरात पालिकेकडून सुरू करण्यात आलेला खत प्रक्रिया प्रकल्प तात्काळ हटवा या मागणीसाठी आज मनसेकडून मुख्याधिकारी संतोष जिरगे निवेदन देण्यात आले.यावेळी हा प्रकल्प अन्यत्र हटविण्यासाठी आठ दिवसात योग्य ती उपाययोजना राबवू,तोपर्यंत हा प्रकल्प बंद राहील,असे मुख्याधिकाऱ्यांच्या गैरहजेरीत निवेदन स्वीकारताना कार्यालयीन अधिक्षक आसावरी शिरोडकर यांनी सांगितले.दरम्यान आठ दिवसात योग्य ती कार्यवाही न झाल्यास “मनसे स्टाईल” मध्ये हा प्रकल्प हटवून,असा इशारा उपस्थित पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आला. पालिकेकडून उभारण्यात आलेला खत प्रक्रिया प्रकल्प शहराच्या मध्यभागी असल्यामुळे त्याची दुर्गंधी संपूर्ण शहरात पसरली आहे.हा प्रकल्प व्यापारी संकुला लगत असल्यामुळे येथील व्यापाऱ्यांची या वासामुळे नामुष्की झाली आहे.तर या ठिकाणावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना सुद्धा नाक मुठीत धरून जावे लागत आहे.हा प्रकल्प हटविण्यासाठी याबाबतची मागणी येथील व्यापाऱ्यांनी सुद्धा मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.दरम्यान आज याच मागणीसाठी मनसे कडून निवेदन देण्यात आले.यावेळी आठ दिवसांच्या मुदतीत हा प्रकल्प हटवू,असे सौ.शिरोडकर यांनी सांगितले.तोपर्यंत हा प्रकल्प बंद ठेवला जाईल,असेही आश्वासन त्यांनी यावेळी दिले.दरम्यान आठ दिवसात हा प्रकल्प येथून न हटल्यास आम्ही मनसे स्टाईलने प्रकल्प हटवू,असा इशारा मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आला आहे.
यावेळी मनसेचे शहराध्यक्ष आशिष सुभेदार,राजू कासकर,संतोष भैरवकर,विठ्ठल गावडे,शुभम सावंत आदी उपस्थित होते.