वेंगुर्ला-वेतोरे येथील अपघात प्रकरणी संशयिताची निर्दोष मुक्तता…

199
2
Google search engine
Google search engine

वेंगुर्ला.ता,०४: 
वेंगुर्ला-वेतोरे येथील अपघात प्रकरणातील संशयित प्रमोद राणे, कुडाळ यांची वेंगुर्ला न्यायालयाचे न्यायाधीश वि.द.पाटील यांनी सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे. संशयिताच्यावतीने अॅड.मनिष सातार्डेकर व अॅड.अक्षदा राऊळ यांनी काम पाहिले. २१ नोव्हेंबर २०१८ रोजी संशयित आपली मारुती इको गाडी घेऊन कुडाळ वरुन वेंगुल्र्याच्या दिशेने जात असताना वेतोरे पुलाजवळ गाडी आली असता सदरील वळणाचा अंदाज न आल्याने संशयिताच्या मालकीची मारुती इको गाडी झाडाला आदळली व या अपघातात गाडीतील इसमाना किरकोळ व गंभीर स्वरुपाच्या इजा झाल्या होत्या. सदर अपघातास संशयित जबाबदार आहेत असे मानून वेंगुर्ला पोलिसांनी संशयिताच्या विरुद्ध गुन्हा नोंद केला होता. मात्र, त्याबाबतचे सबळ पुरावे न्यायालयात सादर करु न शकल्याने तसेच संशयिताच्यावतीने अॅड. मनीष सातार्डेकर यांनी केलेला युक्तीवाद व संशयिताची मांडलेली बाजू योग्य मानून तसेच पुराव्या अंती संशयित सदर अपघातास कारणीभूत नसल्याचे सिद्ध झाल्याने वेंगुर्ला न्यायालयाने ३ फेब्राुवारी रोजी संयशिताची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे.