मुख्यमंत्री दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर फोवकांडा पिंपळ ते जेटी मार्ग उद्या एकेरी वाहतुकीस खुला…

101
2
Google search engine
Google search engine

वाहनचालकांनी नोंद घेण्याचे पोलिसांचे आवाहन…

मालवण, ता. १७ : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सकाळी मालवण दौऱ्यावर येत असून ते सकाळी किल्ले सिंधुदुर्गला भेट देणार आहेत. या पार्श्वभूमीवर फोवकांडा पिंपळ ते जेटी हा एकेरी मार्ग खुला करण्यात आला आहे. सकाळी ८ ते सायंकाळी ४ यावेळेत हा एकेरी मार्ग खुला राहणार आहे. याची वाहन चालकांनी नोंद घ्यावी असे आवाहन पोलिस प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.