शिवचरित्रावर आधारित वक्तृत्व,किल्ले,रांगोळी स्पर्धेचे खा.राणे यांनी केले कौतुक…

102
2
Google search engine
Google search engine

सकल मराठा समाज कणकवलीच्या वतीने शिवजयंती…

कणकवली, ता. १९ : माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी सकल मराठा समाज कणकवली आयोजित छत्रपती शिवजयंती उत्सवाला भेट दिली. महाराज्यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून खा.राणे यांनी अभिवादन केले. भावी पिढी घडवण्यासाठी शिवचरित्र अभ्यासणे, त्यावर व्याख्याने होणे वक्तृत्व स्पर्धा होणे गरजेचे आहे अशा शब्दात खासदार नारायण राणे यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी आमदार नितेश राणे,सौ.नीलमताई राणे ,सभापती दिलीप तळेकर,भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली,आदी उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यानी साकारलेल्या किल्ले प्रतिकृतींची पाहणी केली.रांगोळी स्पर्धा पाहिली व वक्तृत्व कला पाहत स्पर्धकांचे कौतुक केले. याववली सकल मराठा समाज कणकवली चे पदाधिकारी सोनू सावंत, भाई परब,सुशील सावंत,शेखर राणे,,बबलु सावंत,बचू प्रभुगावकर,ऑड. समीर सावंत,सुशांत दळवी,,रमाकांत सावंत,, प्रसाद राणे, चेतन राणे,महेंद्र गावकर,महेश सावंत,माजी सभाती भाग्यलक्षुमी साटम,सायली सावंत,स्वाती राणे ,नीलम सावंत,प्रतीक्षा सावंत, प्रतिक्ष साटम, कविता राणे, आदिती मालपेकर,यांनी स्वागत केले.
यावेळी खासदार विनायक राऊत, संदेश पारकर यांनीही यावेळी छत्रपतींच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले.शिक्षक दत्ता सावंत, प्रसाद राणे,प्रशांत दळवी ,सुहास सावंत, अनंत राणे,दिलीप सुद्रीक आणि मराठा शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे कार्यक्रम यशस्वी केले.