ठाकरे सरकारने जिल्ह्यातील विकासकामे व प्रकल्पांना स्थगिती देण्याचे केले पाप…

116
2
Google search engine
Google search engine

ठाकरे सरकार विरोधात वैभववाडीत भाजपचे धरणे आंदोलन…

वैभववाडी, ता.२५: ठाकरे सरकारने जिल्ह्यातील विकास कामे व प्रकल्पांना स्थगिती देण्याचे पाप केले आहे. १० रुपयात पोटभर जेवण ही योजना म्हणजे गरीबांची निव्वळ थट्टा आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करु या घोषणेचा आता ठाकरे सरकारला विसर पडला आहे. या बिनकामाच्या ठाकरे सरकारला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय भाजपा स्वस्थ बसणार नाही. असा घणाघात भाजपा वैभववाडी शहर प्रभारी सुदन बांदिवडेकर यांनी केले.
महाविकास आघाडी सरकारच्या निष्क्रियते विरोधात वैभववाडी तहसिल कार्यालयासमोर भाजपच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात वैभववाडी भाजपा अध्यक्ष नासीर काझी, जिल्हा सरचिटणीस प्रमोद रावराणे, भालचंद्र साठे, दिलीप रावराणे, राजेंद्र राणे, अरविंद रावराणे, सभापती अक्षता डाफळे, समाजकल्याण सभापती शारदा कांबळे, नगराध्यक्षा अक्षता जैतापकर, उपनगराध्यक्ष रोहन रावराणे, महिला अध्यक्ष भारती रावराणे, शुभांगी पवार, प्राची तावडे, बाळा कदम, हुसेन लांजेकर व नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ठाकरे सरकारच्या विरोधात वैभववाडी भाजपाने भाजपा कार्यालयात ते तहसिल कार्यालय अशी रँली काढत घोषणाबाजी केली. ठाकरे सरकार मुर्दाबाद, ठाकरे सरकार हाय हाय. तसेच सरकारच्या निषेधाच्या घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. नासीर काझी म्हणाले, कोकणातील विकास कामांना स्थगिती देण्याचे काम हे सरकार करत आहे. चांदा ते बांदा योजना ही या सरकारने बंद केली आहे. वैभववाडीतील मुख्यमंत्री ग्रामसडकची सर्व कामे यांनी थांबविली आहेत. या सरकारचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. यावेळी नासीर काझी व पदाधिकाऱ्यांनी निवेदन नायब तहसिलदार श्री नाईक यांच्याकडे सादर केले.

फोटो- ठाकरे सरकार विरोधातील धरणे आंदोलनात सहभागी वैभववाडी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते.