स्वॅप टेस्टिंग बाबत गोवा सरकारकडून परवानगी मिळाली का…

705
2
Google search engine
Google search engine

 

नितेश राणेंचा सवाल;पालकमंत्र्यांसह आमदार खासदार खोटे बोलत असल्याची टीका

कणकवली
गोवा सरकारकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वॅब टेस्टिंग बाबत अद्याप पर्यंत कोणताही निर्णय निश्चित झालेला नसताना सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार व खासदार खोटे बोलत आहेत असा आरोप भाजपचे नेते आमदार नितेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह अन्य जिल्ह्यातील शिवसेना नेत्यांनी मिरजला होणाऱ्या कोरोनाच्या टेस्ट यापुढे गोवा बांबुळी येथील रुग्णालयात होणार आहे त्यासाठी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दिला आहे असे जाहीर केले होते.
मात्र राणें यांच्या पडवेतील हॉस्पिटलमध्ये या सर्व टेस्ट होणार असल्याचा दावा करण्यात आला होता परंतु केवळ राणेंना विरोध करण्यासाठी त्या ठिकाणी स्वॅब टेस्टिंग ची परवानगी न घेता गोवा बांबुळी पाठवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप नितेश राणेंनी केला होता दरम्यान आज त्यांनी केलेल्या मध्ये पालकमंत्र्यांचा आमदार-खासदारांनी खोटे बोलण्याचे टोक गाठले आहे गोवा सरकारकडून अद्याप पर्यंत काही निर्णय नाही तसेच त्यासाठी लागणारे दोन हजार ते अडीच हजार रुपये नेमके कोण भरणार हेही निश्‍चित झाले आहे असे असताना सर्वजण रेटून खोटे बोलत आहेत असा आरोप त्यांनी केला आहे