राणेंच्या पडवेतील वैद्यकिय महाविद्यालयाचा मार्ग मोकळा….

1704
2
Google search engine
Google search engine

केंद्रासह राज्य शासनाची परवानगी; दिडशे एमबीबीएस विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश….

सावंतवाडी/अमोल टेंबकर,ता.१९:माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या प्रयत्नातून साकारलेल्या पडवे येथील वैद्यकिय महाविद्यालयाला अखेर आज परवानगी मिळाली आहे. त्यामुळे दिडशे नव्या एमबीबीएसचे शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी आवश्यक असलेली केंद्र आणि राज्य शासनाची मान्यता प्राप्त झाली आहे. याबाबतची माहिती खासदार नारायण राणे यांनी दिली.

पडवे येथे श्री. राणे यांच्या माध्यमातून सर्व आरोग्य सोयींनीयुक्त असे हॉस्पीटल उभे राहिले होते. श्री. राणे यांनी आपल्या वडिलांच्या प्रेरणेतून खास रुग्णांना सेवा देण्यासाठी हे हॉस्पीटल उभारले होते. गेले काही दिवस आवश्यक असलेली परवानगी न मिळाल्याने प्रवेशाची परवानगी रखडली होती. मात्र त्यासाठी आवश्यक असलेल्या केंद्र व राज्य शासनाच्या परवानग्या आज मिळाल्याने वैद्यकिय महाविद्यालयाचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबतचा शासन अद्यादेश आज राणेंना प्राप्त झाला. सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई यांच्यावतीने मेडिकल कॉलेज ऑफ लाईफटाईम हॉस्पीटल या नावाने हे हॉस्पीटल चालविण्यात येते. दरम्यान या वर्षासाठी केंद्र शासनाने दिडशे विद्यार्थ्यांना एमबीबीएससाठी परवानगी दिलेली आहे.