बांदा शहरानजीक मिळाली स्फोटके.. परिसरात खळबळ….

1174
2
Google search engine
Google search engine

कालव्यात बेकायदा कांड्या;घटनास्थळी बाॅम्ब शोध पथक दाखल

बांदा.ता,०५: 
शहरातील गडगेवाडी येथील हाय व्हॅली हॉटेल नजीक कालव्यात बेकायदा जिलेटीन कांड्या व आढळल्याने एकच खळबळ उडाली. ओरोस येथून बॉम्बशोधक व नाशक पथकाने घटनास्थळी येत झिलेटिनच्या कांड्या सुरक्षितरीत्या निकामी केल्या. यावेळी सावंतवाडीचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी मुळीक व बांदा पोलीस निरीक्षक अनिल जाधव उपस्थित होते.
आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास हॉटेलमध्ये राहणाऱ्या व्यक्तीने कालव्याच्या रस्त्यावर पडलेल्या कांड्या पाहिल्या. त्याने याची कल्पना हॉटेल प्रशासनाला दिली. त्यानंतर तात्काळ या घटनेची खबर बांदा पोलिसांना देण्यात आली. ओरोस येथील बॉम्बशोधक व नाशक पथकाला तात्काळ पाचारण करण्यात आले.
घटनास्थळी परिसर सील करून या कांड्या निकामी करण्यात आल्या. यावेळी शेरा श्वानच्या साहाय्याने कालव्यात व परिसरात स्फोटकांचा शोध घेण्यात आला. संपूर्ण परिसर मेटल डिटेक्टरने पिंजून काढण्यात आला. मात्र अजून स्फोटके मिळाली नाहीत. घटनास्थळी बांदा पोलिसांकडून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.