तिलारी पाटबंधारे कार्यालयाच्या बाजूचे वडाचे झाड कोसळले…

109
2
Google search engine
Google search engine

झाडाखालील हनुमान मंदीराचे नुकसान; परिसरात कोणीच नसल्यामुळे अनर्थ टळला….

सावंतवाडी,ता.१२: येथील तिलारी पाटबंधारे विभाग कार्यालयाला लागून असलेला महाकाय वड आज कोसळला. सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नसली, तरी बाजूला असलेल्या हनुमान मंदीरावर तो कोसळला. यात सुदैवाने कार्यालयाचा काही भागासह मंदीरात असलेल्या मुर्तीला काहीही झाले नाही. याबाबतची माहीती तिलारीचे अधिकारी संदिप राणे यांनी दिली.
दरम्यान याबाबतची माहीती मिळताच, संबधित विभागाचे कार्यकारी अभियंता राकेश धाकतोडे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. याबाबतची माहीती श्री.राणे यांनी दिली. ते म्हणाले, हे वडाचे झाड अनेक वर्षापुर्वीचे असल्यामुळे जिर्ण झाले होते. काल रात्री पासुन पाऊस कोसळत असल्यामुळे ते झाड कोसळले. मात्र परिसरात कोणीच नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला.