तज्ञांच्या अहवालानंतर बॉक्सवेल हटवण्याबाबत कार्यवाही…

296
2
Google search engine
Google search engine

प्रमोद जठार ; नगराध्यक्ष दालनात हायवे ठेकेदार, महामार्ग प्राधिकरण ची संयुक्त बैठक….

कणकवली, ता.१९ : शहरातील उड्डाणपूल जोडणारा बॉक्सवेल अंशतः किंवा पूर्णत: हटविण्याबाबतचा निर्णय नगरपंचायत आणि महामार्ग प्राधिकरण नियुक्त तज्ञ अभियंत्यांच्या सल्ल्यानुसार घेतला जाईल अशी माहिती भाजपचे प्रदेश चिटणीस प्रमोद जठार आणि नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.
शहरातील उड्डाणपुलाला जोडणारा बॉक्स वेल धोकादायक झाल्याच्या पार्श्वभूमीवर येथील नगराध्यक्ष दालनात महामार्ग प्राधिकरण हायवे ठेकेदार आणि लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक झाली यात भाजपचे प्रदेश चिटणीस प्रमोद जठार कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, नगरसेवक शिशीर परुळेकर, अभिजीत मुसळे, हायवेचे अभियंता आर.बी. पवार, दिलीप बिल्डकॉन चे प्रतिनिधी श्री परिहार आदी उपस्थित होते.
या बैठकीत धोकादायक झालेला बॉक्स वेल पूर्णता हटवला जावा अशी मागणी शहरवासीयांची असल्याचे समीर नलावडे यांनी सांगितले. तर दहा मीटर वरील बॉक्सवेल काढून टाकला जावा असे आपले मत असल्याचे प्रमोद जठार म्हणाले. मात्र बॉक्सवेल पूर्णतः हटवायचा की अंशतः काढून टाकायचा याबाबतचा निर्णय तज्ञांच्या मार्फत घेतल्यास अधिक सयुक्तिक ठरेल असे सर्वानुमते निश्चित करण्यात आले. त्यानुसार पुढील दोन दिवसात कणकवली नगरपंचायत बांधकाम तज्ञ नेमणार आहे. तर महामार्ग प्राधिकरण विभागाने त्यांनी नियुक्त केलेले स्ट्रक्चर ऑडिटर यांना आणावे या दोन तज्ञांच्या अभ्यासानंतर शहरातील बॉक्सवेल बाबत निर्णय घेण्याचे ठरविण्यात आले.
महामार्ग विभागाचे उपअभियंता आर बी पवार यांनी गडनदी पूल ते जाणवली पूल यादरम्यान पूर्णतः लांबीचा उड्डाणपूल महामार्ग विभागाने प्रस्तावित केला होता. मात्र त्याला केंद्र सरकारकडून परवानगी मिळाली नव्हती. मात्र आता पूर्वीचा प्रस्ताव पुन्हा पाठविण्याचे निर्देश वरिष्ठ कार्यालयाकडून आले आहेत त्यामुळे तसा सुधारित प्रस्ताव आम्ही केंद्राकडे पाठविणार असल्याचे सांगितले. तर कणकवली शहरवासीयांच्या हितासाठी फ्लायोवर विस्तारित केला जावा त्यासाठी लागणारा निधी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या माध्यमातून आपण उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही प्रमोद जठार यांनी दिली.