मठ गावात भाजप तर्फे रक्षाबंधनाच्या निमित्ताने कोवीड योद्ध्यांना रक्षाबंधन…

149
2
Google search engine
Google search engine

वेंगुर्ले,ता.०३:वेंगुर्ले तालुक्यातील आडेली जि. प. मतदार संघातील मठ गावात भारतीय जनता पक्षाच्या वतीने रक्षाबंधनाच्या निमित्ताने कोवीड योद्ध्यांना रक्षाबंधन करण्यात आले. तसेच मठ सरपंच तुळशीदास ठाकुर यांचे सहीत आरोग्य विभागातील कोवीड योद्ध्यांचा सन्मान सन्मान करण्यात आला.
कोरोना काळात जीवाची परवा न करता लोकांसाठी मदत करणारे मठ गावचे सरपंच तुळशीदास ठाकूर, आरोग्य सेवक श्री. धुरी, गंगावणे मॅडम, सुशीला आईर तसेच मठ सोसायटी चेअरमन सुभाष बोवलेकर यांचा मठ भाजपा वतीने सन्मान पत्र व रक्षा बंधन करून सन्मान करण्यात आला. यावेळी आमदार नितेश राणे यांचें कडून आलेल्या आर्सेनीक अल्बम ह्या गोळ्यांचे वितरण सरपंच तुळशीदास ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बुथ अध्यक्ष अनिल तेंडोलकर, मठ येथील भाजपाचे युवा नेते अजित नाईक, सुनील तेंडोलकर, ग्राम पंचायत सदस्या सौ.लक्ष्मी परब, ग्रा.पं.सदस्य समीर मठकर, कानु गावडे, कृष्णा मठकर, कांता मठकर, अनुज तेंडोलकर आदी उपस्थित होते.