दहावी-बारावीत यश मिळवणार्‍या मुलांसह शाळांचा शिवसेना गौरव करणार…

276
2
Google search engine
Google search engine

१६ ऑगस्टला ओरोस येथे कार्यक्रम; पदाधिकारी सतिश सावंत,संजय पडतेंची माहीती…

सिंधुदुर्गनगरी,ता.१२: दहावी-बारावीत यश संपादन करणार्‍या विद्यार्थ्यासोबत शंभर टक्के निकालाची परंपरा अबाधित ठेवणार्‍या शाळांचा सिंधुदूर्ग जिल्हा शिवसेनेच्या माध्यमातून गौरव करण्यात येणार आहे,अशी माहीती शिवसेनेचे नेते तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतिश सावंत व जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी आज येथे दिली.ते झुम अ‍ॅपच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी ते म्हणाले, शिवसेनेच्या माध्यमातून हा १६ ऑगस्टला दुपारी ओरोस येथिल शरद भवन येथे दुपारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी पालकमंत्री उदय सामंत,खासदार विनायक राऊत,आमदार दिपक केसरकर,वैभव नाईक तसेच सर्व पदाधिकारी उपस्थित राहून गुणवंत विद्यार्थी आणि शाळांचा गौरव करणार आहेत. या कार्यक्रमाला संबधित शाळांनी आणि यश मिळविणार्‍या विद्यार्थ्यानी उपस्थित रहावे,असे आवाहन दोघांनी केले.
यावेळी श्री.सावंत म्हणाले,येणार्‍या काही दिवसात गणेशोत्सव आहे. त्यामुळे या ठीकाणी येणार्‍या चाकरमान्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच आयत्यावेळी यायचे झाल्यास कोविड चाचणी करून जिल्ह्यात यावे,जेणे करुन या ठीकाणी संसर्ग होणार नाही,याची खबरदारी सर्वानीच घ्यावी.