नियोजित झाराप-पत्रादेवी महामार्ग अनधिकृत वापरला जातोय…

2

साई कल्याणकर यांचा आरोप: तात्काळ परवानगी घ्या,अन्यथा आंदोलन…

बांदा ता.२५ नियोजित झाराप-पत्रादेवी महामार्गाला अद्यापपर्यंत नॅशनल हायवे अथोरिटी ऑफ इंडिया यांची परवानगी मिळाली नसताना हा महामार्ग अनधिकृत वापरला जात आहे.असा आरोप बांदा येथील सामाजिक कार्यकर्ते साईप्रसाद कल्याणकर यांनी केला आहे.
याबाबत महामार्ग प्रशासनाने संबंधित ठेकेदाराकडुन उर्वरीत कामे करून तात्काळ हा महामार्ग अधिकृतरीत्या सुरु करावा,अन्यथा आंदोलन केले जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे. याबाबत श्री.कल्याणकर यांनी प्रसिद्धी पत्रक दिली आहे.त्यात असे म्हटले आहे की नियोजित झाराप-पत्रादेवी महामार्ग हा अनधिकृतरित्या वापरला जात आहे. रस्त्याच्या मध्ये झाडें लावलेली नाहीत.रस्त्याला ४ इंचाचे डांबरीकरण केलेले नाही.त्यामुळे रस्ता उंचसखल आहे.परिणामी अपघाताचे प्रमाण वाढते आहे.
बांदा स्मशान भूमी ते इन्सुली हा अपघात क्षेत्र झाले आहे. गाड्या वेगाने ओव्हरलोड हाकल्या जातात.यावर कोणाचे लक्ष नाही बांदा सर्कल वर पोलीस नाही. पोलीस चौकीवर लक्ष दिले जात नाही असे त्यात म्हटले आहे.

7

4