एकता मित्रमंडळाची वार्षिक दहीहंडी साध्या पद्धतीने साजरी…

386
2
Google search engine
Google search engine

मालवण, ता. १२ : शहरातील बाजारपेठ मधील वार्षिक व प्रसिद्ध दहीहंडी विविध कार्यक्रम आणि खेळ स्पर्धा घेऊन फोडली जाते. पण यावर्षीच्या कोरोनाच्या महामारीमुळे दहीहंडी बांधण्यास बंदी असल्याने एकता मित्रमंडळाने एकदम साध्या पद्धतीने जमिनीवर बांधून लहान मुलाच्या हस्ते फोडण्यात आली. यावेळी एकता मित्रमंडळाच्या लोगोचे अनावरण करण्यात आले. यावेळी सर्व एकता मित्रमंडळाचे सदस्य सोशल डिस्टनिंग तसेच मास्क बांधून उपस्थित होते.