मालवणात घंटानाद करत महाविकास आघाडी सरकारचा निषेध…

285
2
Google search engine
Google search engine

भाजपकडून तालुक्यात ठिकठिकाणी मंदिरात घंटानाद ; देवालये सुरू करण्याची मागणी…

मालवण, ता. २९ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली देवालये सुरु करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. मात्र राज्य शासनाने राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी परवानगी दिली नाही. या पार्श्वभूमीवर मालवण शहर भाजपच्यावतीने आज बाजारपेठेतील हनुमान मंदिरात घंटानाद आणि आरती करून अनोख्या पद्धतीने महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी ” दार उघड उद्धवा दार उघड ” अशी साद घालण्यात आली. शहरासह तालुक्यातही मोठ्या प्रमाणात घंटानाद करण्यात आला.
या घंटानाद आंदोलनावेळी भाजपाचे शहर मंडळ तालुकाध्यक्ष दीपक पाटकर, विलास हडकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, विजय केनवडेकर, भाऊ सामंत, गणेश कुशे, आप्पा लुडबे, जगदीश गावकर, प्रमोद करलकर, ममता वराडकर, पूजा सरकारे, पूजा करलकर, मोहन वराडकर, राजू बिडये, महेश सारंग, पंकज पेडणेकर, दीपक चव्हाण, नितीन वायंगणकर, तुषार गावकर, जगदीश चव्हाण, नंदू माणगावकर, रामकृष्ण चव्हाण, विजय चव्हाण, प्रकाश चव्हाण, सुनील रेवंडकर, जगदीश वालावलकर, रामदास इब्राह्मपुरकर, सुरेश बापर्डेकर, अंकुश चव्हाण, बाळू मालवणकर यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.
विलास हडकर यांनी परमेश्वराचे दर्शन घेण्यासाठी ठाकरे सरकार विरोध करत असल्याबाबत नाराजी व्यक्त करत सरकारचा निषेध केला. मंदिरे आणि प्रार्थनास्थळे तातडीने खुली करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.