लेखी आश्‍वासनानंतर हेवाळे ग्रामस्थांचे उपोषण मागे…

170
2
Google search engine
Google search engine

 

दोडामार्ग,ता.१६: मुळस-हेवाळे या पुलाचे काम तात्काळ करण्यात यावे,यासाठी ग्रामस्थांकडून सुरू करण्यात आलेले उपोषण आज अखेर अधिकाऱ्यांच्या लेखी आश्‍वासनानंतर मागे घेण्यात आले.

मुळस-हेवाळे पुलासाठी आज बुधवारी ग्रामस्थांनी आमरण उपोषण छेडले.यावेळी घटनास्थळी तिलारी पाटबंधारे अधिकारी,बांधकाम विभाग,तहसीलदार संजय कर्पे,पं.स.सदस्य बाबुराव धुरी यांनी भेट दिली.यावेळी प्रशासनाने बॉक्स टाइप पुलाचे काम करण्यात येईल अशी ग्वाही दिली.त्यामुळे ग्रामस्थांनी हे उपोषण मागे घेतले.

यावेळी उपोषणात मायकल लोबो,संदेश राणे, स्वप्निल देसाई, आनंद शेटकर, समिर देसाई, नितेश गवस, सुर्यकांत देसाई, प्रविण सावंत आदीसह २४ ग्रामस्थ उपस्थित होते.