कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबीयांना ५० लाखाचे विमा संरक्षण द्या…

120
2
Google search engine
Google search engine

सिंधुदुर्ग मुख्यालय पत्रकार समितीची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर…

सिंधुदुर्गनगरी,ता.१८: कोरोना महामारी च्या काळात काम करताना कोरोना बाधित होऊन मृत्यू पावलेल्या पत्रकारांच्या कुटुंबीयांना 50 लाखाचे विमा संरक्षण कवच द्यावे या मागणीसाठी आज सिंधुदुर्गनगरी जिल्हा मुख्यालय पत्रकार समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी जिल्हाधिकारी के मंजू लक्ष्मी यांना निवेदन सादर केले

कोरोना महामारी च्या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकारांसह संपूर्ण राज्यातील पत्रकार आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत आतापर्यंत अनेक पत्रकारांना कोरणा ची बाधा होऊन राज्यातील 25 पत्रकारांचा बळी गेला आहे कोरोना साथीने मृत्यू झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबीयांना पन्नास लाख रुपयांचे विमा कवच देण्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केले होते त्यानुसार आतापर्यंत राज्यातील 25 पत्रकारांचे कोरोना ने मृत्यू होऊनही एकाही पत्रकारांच्या कुटुंबियांना पन्नास लाखांपैकी दमडीची ही आर्थिक मदत शासनाकडून देण्यात आलेली नाही याबाबत राज्यातील पत्रकारांमध्ये असंतोष पसरला आहे याचाच एक भाग म्हणून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पत्रकारांच्या वतीने आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने देण्यात आली आज सिंधुदुर्गनगरी जिल्हा मुख्यालय पत्रकार समितीच्या वतीने जिल्हाधिकारी के मंजू लक्ष्मी यांना निवेदन सादर करण्यात आले यावेळी जिल्हा मुख्यालय पत्रकार समितीचे उपाध्यक्ष नंदकुमार आयरे ,सचिव संजय वालावलकर, सहसचिव दत्तप्रसाद वालावलकर, सदस्य मनोज वारंग, विनोद दळवी ,विनोद परब, प्रसाद पाताडे आदी उपस्थित होते