तगाई कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचे सातबारे कोरे करा…

106
2
Google search engine
Google search engine

संतोष नानचे;भाजपाकडून दोडामार्ग तहसीलदारांकडे मागणी…

दोडामार्ग, ता.२९:तगाई कर्ज असलेल्या दोडामार्ग तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे सातबारे कोरे करा,अशी मागणी भाजपाचे तालुकाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष संतोष नानचे यांनी दोडामार्ग तहसीलदारांकडे केली आहे. याबाबत त्यांनी निवेदन प्रसिद्धीस दिले आहे.
त्यात असे म्हटले आहे की,महाराष्ट्र शासनाने कोकण विभागातील उतार असलेल्या जमिनीवर वृक्ष लागवड करण्याचा निर्णय १९६४ नंतर घेतला होता. सन १९६३ ते १९७४ या कालावधीत ९० हजार ८८८ हेक्टर क्षेत्रावर वृक्ष लागवड करण्यात आली होती. यात ७०% झाडे जंगली असल्यास वरकस जमिनी शेतकऱ्यांना परत द्यावयाच्या होत्या. मात्र प्रतिकूल हवामानाने ५० % झाडे मरू लागली. या अनुषंगाने शेतकऱ्यांना कर्जात सूट देण्याबाबत विचार करण्यात आला, व २८ फेब्रुवारी १९८९ च्या एका खास आदेशाने तगाई कर्जाला माफी दिली. यानुसार शेतकऱ्यांच्या ७/१२ वरील बोजा कमी करणे आवश्यक होते. मात्र बऱ्याच शेकऱ्यांच्या सातबारा कोरा केला नाही.असे दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य चंदू मळीक, ओबीसी समाजाचे तालुकाध्यक्ष भैया पांगम, संतोष हडीकर आदी उपस्थित होते.