हाथरस येथील घटनेचा जिल्हा युवक काँग्रेस कडून निषेध…

126
2
Google search engine
Google search engine

वेंगुर्ला,ता.०१: उत्त्तर प्रदेश मधील हाथरस येथे घडलेली घटना दुर्दैवी आहे. त्या पिडीत तरुणीच्या घरच्या लोकांना भेटायला जात असताना ऊत्तरप्रदेश पोलिसांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना अडविले, धक्काबुक्की केली, लाठीमार केला याचा या सर्व दुर्दैवी घटनेचा आम्ही सिंधुदुर्ग जिल्हा युवक कॉंग्रेसच्या वतीने जाहीर निषेध करत आहे, असे सिंधुदुर्ग जिल्हा युवक काँग्रेस चे कार्याध्यक्ष सिद्धेशपरब यांनी म्हटले आहे.
ऊत्त्तरप्रदेश मधील हाथरस येथे एका दलित तरुणीवर काही नराधमांनी बलात्कार केला तीची जीभ छाटली मारहाण केली त्यात तिला फ्रँक्चर झाले मणका तुटला हि घटना घडली १४ सप्टेंबर रोजी त्यामुलीचा म्रुत्यु २९ तारीखला झाला पोलिस फक्त मारहाण झालीअस म्हणत होते बलात्काराचा गुन्हा नोंदवुन घ्यायला तयार नव्हते. ती मुलगी शुद्धीवर आल्यावर तिने आपल्यावर घडलेली घटना जगासमोर आणली.परंतु ऊत्तर प्रदेशचे भाजपाचे योगी सरकार 29 तारीख पर्यंत बलात्काराचा गुन्हा नोंदवुन घेण्यासाठी तयार नव्हते त्या मुलीचा म्रुत्यु झाल्यावर सरकारला जाग आली.सदर मुलीच्या म्रुतदेहाचे रात्रीच्या काळोखातच पोलिसांनी विधी केले घरच्या लोकांकडे म्रुतदेह दिला नाही प्रशासनाला अशी कोणती गोष्ट लपवायची होती जी जगासमोर येऊ नये कोणाला पाठीशी घालायचे होते. या नराधमांना सरकार का पाठीशी योगी सरकार घालतय हे प्रश्न राहुल गांधीनी ऊपस्थित केले आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.