हाथरस येथील घटनेचा महिला राष्ट्रवादी काँग्रेसकडून सावंतवाडीत निषेध…

192
2
Google search engine
Google search engine

आरोपींवर कारवाईसाठी सिंधुदुर्गातून पाच हजार पत्रे पंतप्रधानांना पाठवणार; सौ रेवती राणे…

सावंतवाडी,ता.०५: हाथरस येथे झालेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा महिला राष्ट्रवादीच्या माध्यमातून आज सावंतवाडी निदर्शने करण्यात आली. यावेळी संबंधित आरोपींवर कारवाई करण्यात यावी,अशी मागणी करणारी तब्बल पाच हजार पत्रे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पाठविण्यात येणार आहे. असा इशारा महिला जिल्हाध्यक्ष सौ.रेवती राणे यांनी दिला.येथील मोती तलावाच्या काठावर हॉटेल मॅंगो २ च्या समोर हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी सावंतवाडी-सिंधुदुर्ग जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडुन सावंतवाडी कॉलेज चौकात महिला एकत्र येऊन उत्तरप्रदेश येथील युवती वर केलेल्या अत्याचाराच्याविरुद्ध रस्त्यावर उतरून योगी सरकारचा निषेध असो,उत्तर प्रदेश सरकार हाय हाय ,उत्तरप्रदेश पोलीसांना निलंबित कराच्या घोषणा देत महिलांनी परिसर दनदणून सोडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष रेवती राणे,प्रदेश सरचिटणीस सुरेश गवस, प्रांतिक सदस्य उदय भोसले, रंजना निर्मल, अंकिता देसाई, नम्रता सावंत, ऍड.आरती पवार, तनया देसाई, निधि पास्ते मिताली देशमुख,स्नेहल शिवलकर,प्रतीक्षा सावंत,सायली पेंडूरकर ,दिशा पेंडूरकर,निशीगंधा सावंत, मागासवर्गीय सेलचे जिल्हा अध्यक्ष विजय कदम, एम.डी सावंत, योगिता राऊळ ,शहराध्यक्ष धारणकर विमुक्त व भटक्या जाती अध्यक्ष अशोक पवार आकेरी माजी सरपंच संदिप राणे ,अमोल पालव आदी उपस्थित होते