कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी श्री देव बांदेश्वर मंदिरात ‘श्री महामारी स्तोत्राची’ आवर्तने…

178
2
Google search engine
Google search engine

बांदा,ता.०९: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी व कोरोनाच्या संकटातून सर्वांचे रक्षण व्हावे, या रोगाचे देशातून, जगातून समूळ उच्चाटन व्हावे यासाठी रविवार  ११ ऑक्टोबर रोजी येथील आराध्य श्री देव बांदेश्वर मंदिरात ‘श्री महामारी स्तोत्राची’ आवर्तने करण्यात येणार आहेत. सर्वाना चांगल्या प्रकारे आयुष्य प्राप्त व्हावे तसेच वैद्यक शास्त्रज्ञांना लस निर्मितीत यश मिळावे अशी प्रार्थना करण्यात येणार आहे.

यापूर्वी बांदा शहर व दशक्रोशीत माकडतापाने थैमान घातले होते. त्यावेळी येथील श्री रामभट स्वामी समाधी मंदिरात ‘श्री वडवानर स्त्रोतांची आवर्तने करण्यात आली होती. त्यानंतर या परिसरात माकडतापाचा प्रादुर्भाव कमी झाला होता. दुपारी १२ ते रात्री ८ या वेळेत सामाजिक अंतर राखून सर्व भाविकांनी तीर्थ प्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.