शिष्यवृत्ती परीक्षेत कणकवली एस.एम.हायस्कूलचे यश…

259
2
Google search engine
Google search engine

कणकवली, ता.२०:  सन 2019-20 या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत कणकवलीतील एस.एम.हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.

पूर्व माध्यमिक (इयत्ता आठवी) मध्ये हायस्कूलमधून परीतोष संतोष राणे याने प्रथम क्रमांक, स्वरा रमण बाणे हिने द्वितीय क्रमांक तर ओम योगेश गोसावी याने तृतीय क्रमांक मिळविला. पूर्व उच्च माध्यमिक (इयत्ता पाचवी) परीक्षेत वेदिका भास्कर काजरेकर हिने प्रथम क्रमांक, धारा दिलीप कदम हिने द्वितीय तर रोमा सचिन ठाकूर हिने तृतीय क्रमांक मिळविला. आठवी मधून 14 तर पाचवीमधून 18 विद्यार्थी शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी पात्र ठरले आहेत. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कणकवली शिक्षण संस्था कणकवलीचे चेअरमन डॉ.एस.एन. तायशेटे, सचिव डी.एम. नलावडे , उपकार्याध्यक्ष श्री.काणेकर, मुख्याध्यापक श्री.पोतदार, उपमुख्याध्यापक श्री.जोशी, पर्यवेक्षिका सौ.मसुरकर यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.