नितेश राणे यांच्या उपस्थितीत वैभववाडी शहरातील युवकांचा भाजपात प्रवेश…

276
2
Google search engine
Google search engine

कणकवली, ता.३१ :आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत, वैभववाडी नगरपंचायत चे माजी नगराध्यक्ष संजय चव्हाण व नगरसेवक संतोष पवार यांच्या नेतृत्वाखाली वैभववाडी शहरातील युवकांना भारतीय जनता पक्षात प्रवेश देण्यात आला. ओम गणेश निवास्थानी झालेल्या या प्रवेश कार्यक्रमात या सर्व युवकांचे भाजपा पक्षात आ. नितेश राणे यांनी स्वागत केले.
यावेळी दीपक गजोबार, राजेश गजोबार, प्रवेशकर्ते शब्बीर काझी, निलेश तांबे, शैलेश गावडे, अंकित गजोबार, महेश परब, राहुल पांचाळ,समीर गजोबार,अक्षय पंडित, संदीप गोसावी, विकी मोहिते, प्रताप मोहिते, समाधान निकम, सचिन चव्हाण, प्रतीक मोहिते, शुभम रावराणे, गणेश लसने, बाबा शेख उपस्थित होते.