सिंधुदुर्गवासीयांची शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी पूर्ण…

343
2
Google search engine
Google search engine

 

अरविंद मोंडकर ; परवानगी मिळवून दिल्याबद्दल अमित देशमुख व आघाडी सरकारमधील सहयोगी मंत्र्यांचे आभार…

मालवण, ता. २४ : अनेक वर्षांपासून ताटकळत असलेली जिल्हावासीयांची वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी आज पूर्ण झाली. ही मागणी आज सत्यात उतरली असून जिल्हावासीसाठी महत्वाची आनंदाची बातमी असल्याचे युवक काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ता अरविंद मोंडकर यांनी सांगितले.
आमच्या महाविकास आघाडी सरकारने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ओरोस येथील जागा निश्चित करण्यात आली आहे. सिंधुदुर्गनगरी येथील नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यासाठी प्रस्ताव आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत होता तो पास करण्यात आला.
जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जिल्हा प्रशासनाने किमान २० एकर जागा निश्चित करुन वैद्यकीय शिक्षण विभागास लवकरात लवकर कळवावे असे जिल्हा प्रशासनाला मंत्री महोदयांनी निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने देखील त्वरित कार्यवाही करत त्याबाबतचा अहवाल सचिवांजवळ पाठवला होता. या महाविद्यालयास परवानगी मिळवून दिल्याबद्दल अमित देशमुख तसेच जिल्हा प्रशासनाचे व आघाडी सरकार मधील सहकारी मंत्री महोदयांचे आभार मानत असल्याचे श्री. मोंडकर यांनी म्हटले आहे.