नोटिसा आणि दमबाजीच्या अरेरावीला सिंधुदुर्गात भाजपा ठोकणार टाळे…!

237
2
Google search engine
Google search engine

राजन तेली;महावितरणविरोधात “ताला ठोको और हल्लाबोल” आंदोलन…

सिंधुदुर्गनगरी, ता. ३ : ७५ लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवून महाराष्ट्रातील ४ कोटी जनतेला अंधारात टाकण्याचे पाप करणाऱ्या महावितरणाच्या निषेधार्थ ५ फेब्रुवारी २०२१ रोजी भाजपाने राज्यभर मंडलस्तरावरील महावितरण केंद्रांवर “ताला ठोको और हल्लाबोल” आंदोलन आयोजित केले आहे. अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिली.
सिंधुदुर्ग भाजपाने यापूर्वीच नोटिसा पाठवून वीज खंडित करणाऱ्या महावितरणला कडक शब्दात इशारा दिला होता. त्यानुसार जिल्हाभर प्रत्येक मंडलामध्ये अशा प्रकारच्या आक्रमक निषेध आंदोलन छेडण्याचा इशारा श्री. तेली यांनी दिला आहे.