जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत अणसूर येथील सद्गुरू प्रासादिक भजन मंडळ प्रथम…

306
2
Google search engine
Google search engine

वेंगुर्ले,ता.१७:
माघी गणेश जयंती निमित्त कारिवडे-पेडवेवाडी ग्रामस्थ आयोजित भव्य जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धेत वेंगुर्ले तालुक्यातील अणसूर येथील सद्गुरू प्रासादिक भजन मंडळाने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. या संघाला मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
जिल्हास्तरीय या निमंत्रित भजन स्पर्धेत अनेक संघ सहभागी झाले होते. यामध्ये अणसूर येथील बुवा तेजस मेस्त्री यांच्या सद्गुरु प्रासादिक भजन मंडळाने उत्कृष्ट सादरीकरण करीत स्पर्धेत उपस्थित भजन रसिकांकडून दाद मिळवली. स्पर्धेत निवजेश्वर प्रासादिक भजन मंडळ द्वितीय, राम कृष्ण हरी सेवा संघ पाट पंचक्रोशी तृतीय तर उत्तेजनार्थ बक्षीस श्री दत्तगुरु प्रासादिक भजन मंडळ,वैभववाडीने पटकाविले. सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरवण्यात आले.अणसुर भजन मंडळाचे भावेश राणे यांना
उत्कृष्ट तबला वादक म्हणून गौरवण्यात आले. या संघात पखवाज वादन मनीष तांबोसकर यांनी केले तर संगीत साथ भाऊ मालवणकर, नितेश गावडे, शंकर मेस्त्री, भुवनेश मेस्त्री, हर्षल मेस्त्री, सुनील गावडे, विनोद परब, शरद मेस्त्री, विजय मालवणकर यांची लाभली.तसेच सचिन नाईक, गौरव गावडे, अमित परब, प्रवीण कांदळकर, सागर सावळ यांचे सहाय्य लाभले.स्पर्धेचे परीक्षण संगीत विशारद विनोद गोखले व उत्कृष्ठ तबला वादक ट्रिपल ग्रॅज्युएट इन तबला श्री रोहिदास परब यांनी केले.