फोंडाघाट येथे जमीन वादातून दोन कुटुंबात हाणामारी

1456
2
Google search engine
Google search engine

तालुक्यातील फोंडाघाट येथे जमीन वादातून दोन कुटुंबात हाणामारी झाल्याची घटना सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या हाणामारीत दोन्ही कुटुंबातील ७ जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यात तिघांच्या डोक्याला मार बसला आहे. जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

फोंडाघाट बावीचे भाटले येथे पारकर व कातरुड या दोन कुटुंबात जमिनीचे वाद होते. या वादामुळे सायंकाळी पारकर यांच्या कुटुंबातील लोकांनी कातरुड हे राहत असलेल्या घरी जात वाद केला. त्यात दोन्ही कुटुंबात लाकडी दांडा व अन्य साहित्याच्या साहाय्याने त्या दोन्ही कुटुंबातील सातजण जखमी झाल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.
भीर जखमींमध्ये गणेश मधुकर पारकर (४७),ताराचंद्र मोहन पारकर ४९( दोघेही राहणार फोंडाघाट जुनाबाजार),तसेच एकनाथ धोंडू कातरुड व पत्नी शुभांगी मुलगा प्रशांत (सर्व राहणार फोंडाघाट) हे जखमी झाले आहेत.
याप्रकरणी कणकवली पोलिसांनी दोन्ही कुटुंबातील धाव घेतली आहे.मात्र पोलीसांनी पहिल्यांदा कणकवली उपजिल्हा रुग्णालयात जाऊन उपचार घ्या, नंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात येईल,असे सांगितले आहे. त्यामुळे रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती, अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.