एसपीके कॉलेज समोर पोलीस चौकी पुन्हा उभारा…

351
2
Google search engine
Google search engine

 

सावंतवाडी युवक राष्ट्रवादीची मागणी; पोलीस प्रशासनाला निवेदन सादर….

सावंतवाडी ता.२३: येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयासमोर पुन्हा पोलीस चौकी उभारण्यात यावी,अशी मागणी आज युवक राष्ट्रवादीच्या वतीने सावंतवाडी पोलिसांकडे करण्यात आली आहे.दरम्यान महाविद्यालयीन युवक-युवतींच्या मनात भीती राहण्यासाठी या ठिकाणी पोलिस चौकी अत्यावश्यक आहे,असेही त्यांनी यावेळी सांगितले.याबाबतचे निवेदन त्यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
त्यात असे नमूद करण्यात आले आहे की,येथील पंचम खेमराज महाविद्यालया समोर पूर्वी पोलीस चौकी होती.मात्र ती आता हटविण्यात आली आहे.त्यामुळे संबंधित परिसरात मुलींची छेड काढणे,बाईक रेस लावणे, फ्रीस्टाइल,आदी गैरप्रकार वाढले आहेत.या प्रकारांना आळा घालण्यासाठी पुन्हा त्या ठिकाणी पोलीस चौकीची गरज आहे,असे त्यांनी म्हटले आहे.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहरअध्यक्ष अभिजीत पवार,राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाअध्यक्ष राजू धारपवार,राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा सदस्य अर्षद बेग,सदस्य परेश तांबोस्कर,इम्रान शेख, प्रतीक सावंत,शेलटन नरोना,दीपक पाटकर,सोहेल शेख व शहरातील युवक काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.