सावंतवाडी पंचायत समितीचे प्रभारी सभापती शितल राऊळ यांचे भाजपाकडून स्वागत…

416
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी, ता.१२: येथील पंचायत समितीच्या प्रभारी सभापती पदाची जबाबदारी शितल राऊळ यांच्याकडे दिल्यानंतर त्यांचे आज तालुका भाजपच्या वतीने स्वागत करण्यात आले.सभापती मानसी धुरी यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान त्यांच्या अध्यक्षतेखाली आज पहिलीच मासिक सभा संपन्न झाली.यावेळी तालुक्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.
यावेळी जिल्हा चिटणीस महेश सारंग,माजी सभापती पंकज पेडणेकर,जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कामत,गुरुनाथ पेडणेकर,माजी सभापती रवींद्र मडगावकर,बाबू सावंत,संदीप नेमळेकर,अक्रम खान,विकी केरकर,प्राजक्ता केळुसकर,गौरी पावसकर रेश्मा नाईक,ऋतिका बागकर,निकिता सावंत आदी उपस्थित होते.