गस्तीनौकेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल…

518
2
Google search engine
Google search engine

निवती रॉकनजीकच्या समुद्रातील घटना ; सहा ट्रॉलर्स विरोधात तक्रार…

वेंगुर्ले,ता.१५: निवती राॅक समुद्र परिसरात गस्त घालणाऱ्या मत्स्यव्यवसाय विभागाच्या ‘शीतल’ गस्ती नौकेवर हल्ला करण्याचा प्रकार परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर्सकडून झाला. ही घटना शनिवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान मत्स्य अधिकारी मुरारी भालेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सहा हायस्पीड ट्रॉलर्स विरोधात तक्रार देण्यात आली असून त्यानुसार पोलिसांनी संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.