सिंधुदुर्गातील व्यापारी-दुकानदारांनी कोरोना चाचणी करून घ्यावी…

605
2
Google search engine
Google search engine

जिल्हाधिकार्‍यांचे आवाहन; वाढते रुग्ण आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन सज्ज…

ओरोस ता.२५: जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे पुन्हा एकदा सुरक्षितेच्या दृष्टीने पावले उचलण्यास जिल्हा प्रशासनाने सुरूवात केली आहे.यापार्श्वभूमिवर जिल्ह्यातील सर्व व्यापारी दुकानदार आणि व्यावसायिकांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी,असे आवाहन जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी यांनी केले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व व्यापारी, दुकानदार, व्यवसायिक यांनी स्वतः तसेच त्यांच्या आस्थापनामध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचारी, कामगार यांनी दिनांक १५ एप्रिल पर्यंत जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालय येथे येऊन आरटीपीसीआर ( RTPCR) टेस्ट करून घ्यावी.जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालय येथे आरटीपीसीआर (RTPCR) टेस्टची विनामुल्य, मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा ग्रामीण रुग्णालय येथून प्राप्त झालेला अहवाल व्यापारी, कामगार यांनी स्वतः जवळ ठेवणे आवश्यक आहे. दि. 15 एप्रिल 2021 अखेर ज्या व्यापारी, कामगार यांनी तपासणी करून अहवाल प्राप्त करून न घेतल्याचे आढळून येईल त्यांची आस्थापना, दुकान जिल्हाधिकारी कार्यालयाकडील पुढील आदेशपावेतो बंद करण्यात येईल. असे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत.