पडेल संघ ठरला ब्ल्यू अँड ऑरेंज चषकाचा मानकरी

355
2
Google search engine
Google search engine

इळयेतील क्रिकेट स्पर्धा ; श्रीराम भटवाडी-जामसंडे संघ ठरला उपविजेता

देवगड, ता. ३० : इळये बौद्धवाडी येथील संघर्ष इलेव्हन क्रिकेट संघाच्या वतीने आयोजित खुल्या टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेत फ्रेंड्स क्लब पडेल संघाने श्रीराम भटवाडी-जामसंडे संघाचा पराभव करत ब्ल्यू अँड ऑरेंज चषकावर नाव कोरले. स्पर्धेत भटवाडी संघ उपविजेता ठरला. ‘एक गाव, एक संघ’ या नियमावर आधारित स्पर्धेत जिल्ह्यातील २८ संघ सहभागी झाले होते.

उपांत्यफेरीत फ्रेंड्स क्लब पडेल संघाने महालक्ष्मी इळये संघाचा तर श्रीराम भटवाडी संघाने पावणाई शिरगाव संघाचा पराभव करत अंतिम फेरी गाठली होती. विजेत्या पडेल संघाला ११ हजार १११ रुपये, उपविजेत्या भटवाडी संघाला ६ हजार ६६६ रुपये तर तृतीय महालक्ष्मी इळये आणि चतुर्थ शिरगाव संघाला अनुक्रमे २ हजार २२२ रुपये व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. उत्कृष्ट फलंदाज मयुरेश कदम (महालक्ष्मी इळये), गोलंदाज अमित चिंदरकर (श्रीराम भटवाडी), सामनावीर रोहित पडेलकर (पडेल), मालिकावीर अमित चिंदरकर याना वैयक्तिक पारितोषिकांसह चषक देऊन सन्मानित करण्यात आले.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण शिवसेना युवा नेते संदेश पारकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख विलास साळसकर, बुवा तारी, रमाकांत कदम, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष कोंडके, दीपक कदम, रवींद्र जोगल आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

सामन्यासाठी पंच म्हणून अभिजित जाधव

अमोल जाधव, उमेश जाधव, निलेश कदम, वैभव थोटम, प्रतीक परब, मयुरेश कदम तर समालोचन नितीन जाधव, मनीष ठुकरुल, बबन नाईक, फलक लेखन दीपक जाधव, चंद्रकांत जाधव, प्रवीण मालंडकर तर गुणलेखन विवेक जाधव, विनोद परब यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वीतेसाठी सदाशिव जाधव, संदीप जाधव, कृणाल जाधव, राज जाधव, साहिल जाधव, स्वप्नील जाधव, अक्षय जाधव, हर्ष जाधव, प्रथमेश कोंडके, कृष्णा जाधव, सागर जाधव यांच्यासह बाळकृष्ण जाधव, मुकुंद जाधव, परशुराम जाधव, विश्वास जाधव, चंद्रकांत जाधव, दत्ताराम जाधव, धोंडू जाधव, श्रीधर जाधव, भिकाजी जाधव तसेच महिला मंडळाचे विशेष सहकार्य लाभले.