अज्ञात वाहनाच्या धडकेत आंबोली येथे युवक गंभीर जखमी…

743
2
Google search engine
Google search engine

आंबोली,ता.०६: अज्ञात कारने धडक दिल्याने चौकुळ-नेनेवाडी येथील गॅरेज चालक कमलेश गावडे (वय २२), हा युवक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात आंबोली येथे घडला. तो घरी जात असताना अज्ञात कारने त्याला ठोकरले. त्याला अधिक उपचारासाठी आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. त्यासाठी नारायण कोरगावकर, उत्तम पारधी व ग्रामस्थांनी मदतकार्य केले. यावेळी पोलीस जमादार आत्माराम तेली व सहकारी त्या अज्ञात कारचा शोध घेत आहेत.