मळगाव येथे बॉक्सवेलच्या ठिकाणी बहिर्वक्र आरसा…

777
2
Google search engine
Google search engine

वाहनधारकांतून समाधान;अपघात रोखण्यासाठी ग्रामपंचायतीचा पुढाकार…

सावंतवाडी,ता.१०: झाराप-पत्रादेवी मार्गावर मळगाव येथील बॉक्सवेलजवळ अपघाताची शक्यता लक्षात घेता, ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करून मळगाव ग्रामपंचायतीतर्फे खबरदारी म्हणून रस्त्याच्या दोन्ही बाजुला बहिर्वक्र आरसे बसविण्यात आले आहेत. मळगाव ग्रामस्थ व वाहन धारकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
झाराप-पत्रादेवी मार्गावर मळगाव येथील बॉक्सवेल नजीक रस्त्याच्या दोन्ही बाजूने येणाऱ्या गाड्यांचा अंदाज येत नव्हता. त्यामुळे या ठिकाणी किरकोळ तसेच मोठ्या अपघाताची संख्या वाढली होती. तसेच यापुढेही अपघाताची शक्यता नाकारता येत नसल्याने या ठिकाणी बहिर्वक्र आरसे बसविण्यात यावेत,अशी मागणी मळगाव ग्रामस्थ व वाहनधारकांमधून सतत होत होती. सतत होणाऱ्या या मागणीचा विचार करून अखेर मळगाव ग्रामपंचायतीतर्फे या ठिकाणी बहिर्वक्र आरसे बसविण्यात आले आहेत. पत्रादेवी येथून येणारा बायपास जवळ असलेला सर्विस रोड हा मळेगाव ग्रामपंचायत बाजारपेठेकडे तसेच सावंतवाडीच्या दिशेने असलेल्या वेंगुर्ला-बेळगाव रोडला जोडला जातो. त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहन असतात, तसेच बायपास अलीकडे रेडकर वाडी, ब्राह्मण आळी, मांजरेकरवाडी, पाडगावकर वाडी अशी मोठ्या संख्येने वस्ती असल्याने स्थानिक वाहनधारक मोठ्या संख्येने ये-जा करतात, ह्याचा विचार करून ग्रामपंचायत मार्फत बहिर्वक्र आरसे बसवण्यात आले आहेत. त्यामुळे आता अपघाताचे प्रमाण कमी होणार आहे.