जानवली सरपंचपदासाठी भाजपाच्या शुभदा रावराणे यांचा एकमेव अर्ज

412
2
Google search engine
Google search engine

शिवसेनेकडून अर्ज नाही : निवड बिनविरोध शक्य

कणकवली, ता.२०: जानवली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी शुभदा राजेश रावराणे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला आहे. काल शिवसेनेचे प्रभारी सरपंच शिवराम उर्फ काका राणे यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश करत भाजपला धक्का दिला होता.
सरपंच निवडीच्या पूर्वसंध्येला प्रभारी सरपंच यांचा शिवसेनेत प्रवेश झाल्याने कणकवली तालुक्याचे आज होणाऱ्या जानवली सरपंच निवडीकडे लक्ष लागून राहिले होते. मात्र, शिवसेनेकडून सरपंचपदासाठी एकही नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले नसल्याने भाजपला धक्का देण्याचा शिवसेनेचा प्लॅन कोलमडल्याचे बोलले जाते. शुभदा रावराणे यांची औपचारिक सरपंच म्हणून निवड जाहीर होण्याकरिता दुपारी २ वाजेपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. दुपारी २ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी पी. डी. पालकर यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत सदस्यांची बैठक ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे २ वाजल्यानंतर अधिकृत सरपंच निवड जाहीर केली जाणार आहे.