बांदा शहरातील आज पुकारलेला बंद शंभर टक्के यशस्वी…

31
2
Google search engine
Google search engine

रॅपिड टेस्ट मध्ये एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही; सरपंचासह वैद्यकीय अधिका-यांनी मानले समाधान…

बांदा,ता.२१:
बांदा शहर व परिसरात आज एकही कोरोना बाधित रुग्ण न मिळाल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी दिली. बांदा शहरात मंगळवारी 100 टक्के बंद पाळण्यात आल्याने ही दिलासादायक बातमी असल्याचे सरपंच अक्रम खान यांनी सांगितले.
गेल्या ४ दिवसात बांदा परिसरात कोरोना बाधित रुग्ण सापडले होते. त्यामुळे मंगळवारी संपूर्ण बाजारपेठ १०० टक्के बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामपंचायत, पोलीस, आरोग्य प्रशासन व व्यापारी संघाने घेतला होता. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी बांदावासीयांनी एकजूट दाखविली. त्यामुळे आज एकही बाधित रुग्ण सापडला नाही.