बांद्यात गणेशाेत्सव विठ्ठल मंदिर मंडळाने गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप…

45
2
Google search engine
Google search engine

बांदा,ता.१४: येथील सार्वजनिक गणेशाेत्सव विठ्ठल मंदिर बांदा या मंडळाने बांदा शहरातील १५० गरीब व गरजु कुटुंबियांना काेराेना महामारीच्या काळात मदतीचा हात देत सामाजिक बांधीलकी जपली आहे. या कुटुंबियांना धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे घरपोच वाटप करण्यात आले.

गेली अनेक वर्षे हे मंडळ सामाजीक कार्यात अग्रेसर आहे. रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी दरवर्षी रक्तदान शिबीर आयोजित करते. गतवर्षी देखील काेराेना संकटाच्या काळात मंडळाने गरजु कुटुंबियाना सामानाचे वाटप करत मदतीचा हात दिला होता. दाेन वर्षापुर्वी बांदा शहरात तेरेखाेल नदीला महापूर येऊन आलेल्या नुकसानीत अनेक कुटुंबियाना अन्नधान्याचे वाट करुन एक वेगळा समाज सेवेचा आर्दश निर्माण केला हाेता.
आज देशावर काेराेनाचे महाभयंकर संकट काेसळले आहे. या संकटावर मात करण्यासाठी काेराेना याेध्दा म्हणुन डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पाेलीस कर्मचारी, शासकीय अधिकारी, सामाजीक कार्यकर्ते अहाेरात्र मेहनत घेत आहेत. आपणही या देशसेवेत सहभागी व्हावे व समाज बांधीलकी जपावी या उद्देशाने १५० गरजु कुंटुबियाना जिवनावश्यक वस्तुचे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी सार्वजनीक गणेशाेत्सव मंडळाचे अध्यक्ष मंदार कल्याणकर, उपाध्यक्ष साईप्रसाद काणेकर, सचिव राकेश केसरकर, खजिनदार ओंकार नाडकर्णी, ज्ञानेश्वर येडवे, संदेश पावसकर, सर्वेश गाेवेकर, विशांत पांगम, रामचंद्र उर्फ भाऊ वाळके, राजेश विर्नाेडकर, समिर कल्याणकर, साई विर्नाेडकर, अर्णव स्वार, बाळा आकेरकर, निखिल मयेकर, अक्षय नाटेकर, अथर्व पावसकर, निलेश कदम, प्रथमेश गाेवेकर, ज्याेतीनंद कुंभार, ओंकार नाटेकर, रामा येडवे, अजिंक्य पावसकर, गाैरव विर्नाेडकर, सुदेश येडवे, संकल्प केसरकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित हाेते.
यावेळी मंदार कल्याणकर म्हणाले की, कोरोनाचे संकट गंभीर असून प्रत्येकाने स्वत:ची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी. सामाजिक अंतर ठेवुन, मास्क लावुन सरकारी आदेशाचे पालन करावे.