भुईबावडा परिसरात तौक्ते चक्रिवादळाचा जोरदार तडाखा

52
2
Google search engine
Google search engine

अनेकांच्या घरावरील कौले, पत्रे गेले उडून; लाखोंचे नुकसान

वैभववाडी/पंकज मोरे,ता.१७:  शनिवारी मध्यरात्री घोंगवणा-या तौक्ते चक्रिवादळाने अक्षरशः सगळ्यांची झोप उडविली आहे. रविवारी रात्री उशिरापर्यंत जोरदार चक्रिवादळ सुरू होती. भुईबावडा परिसराला या चक्रिवादळाचा अक्षरशः जोरदार तडाखा बसला. या चक्रिवादळात अनेकांच्या घरावरील तसेच गोठ्यावरील कौले,पत्रे उडून अंदाजे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शिवाय आंबा बागायतदारांचेही मोठे नुकसान झाले आहे.
शनिवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या चक्रिवादळाने अक्षरशः जनजिवन विस्कळीत केले आहे. भुईबावडा टेमकरवाडी येथील चंद्रकांत नामदेव मोरे यांच्या घरावरील कौले तसेच आवळा, आंबा कलमांचे मोठे नुकसान झाले आहे. बाजारपेठेतील अमित इब्राहीम शहा यांच्या घरावरील कौले, आंगणातील पत्रे, शौचालयावरील पत्रे उडून हजारोचे नुकसान झाले आहे. तसेच भुईबावडा परिसरातील अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे. महसूल विभागाकडून पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू आहे.