बीड येथे ५ जूनला मराठा मोर्चाचे आयोजन…

20
2
Google search engine
Google search engine

सिंधुदुर्गातील जास्तीत-जास्त बांधवांनी उपस्थित रहावे ; अशोक सावंत…

कुडाळ,ता.३१: मराठा आरक्षणासंदर्भात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ५ जूनला बीड येथे होणाऱ्या मराठा मोर्चाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन शिवसंग्राम संघटनेचे सिंधुदुर्ग अध्यक्ष अशोक सावंत यांनी केले आहे. याबाबत नुकतीच बैठक घेण्यात आली.यावेळी जिल्ह्यातील जास्तीत जास्त मराठा बांधवांनी या मोर्चाला उपस्थित रहावे,या संदर्भात चर्चा करण्यात आली.हा मोर्चा शिवसंग्रामचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे.या पार्श्वभूमीवर मुंबई प्रदेशाध्यक्ष सत्यवान राऊत यांच्या सूचनेनुसार धुळे जिल्ह्यात बैठक आयोजित करण्यात आली होती.