कणकवली तालुक्यात सर्वाधिक ३२ मि.मी. पाऊस…

24
2
Google search engine
Google search engine

सिंधुदुर्गनगरी,ता.०८: जिल्ह्यात गेल्या २४ तासात कणकवली तालुक्यात सर्वाधिक ३२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी १२ पूर्णांक ७५ मि.मी पावसाची नोंद झाली झाली आहे. १ जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी ८४.१२५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – ०६(६८), सावंतवाडी – १२(१३३), वेंगुर्ला – १२(२६), कुडाळ – ०३(५४), मालवण – २९(१३६), कणकवली – ३२(४४), देवगड – ०५(९७), वैभववाडी – ०३(११५), असा पाऊस झाला आहे.