आमदार दीपक केसरकरांच्या तोंडात संपवण्याची भाषा शोभत नाही…

31
2
Google search engine
Google search engine

अजय गोंदावळे ; अपहार केला नाहीत, तर संजू परबांवर इतके का घसरलात..?

सावंतवाडी,ता.११: येथील पालिकेच्या उद्यानात झालेल्या विकास कामात मोठा अपहार झाला, ही वस्तुस्थिती आहे. ती कामे स्वतः पाहून आमदार केसरकरांनी योग्य तो निर्णय घेणे गरजेचे होते,मात्र आपले अपयश लपविण्यासाठी थेट नगराध्यक्ष संजू परब यांचे राजकीय अस्तित्व संपवण्याची भाषा त्यांना शोभत नाही.विकास कामात अपहार झाला नाही,असे वाटते तर इतके का घसरलात?,असा सवाल असे प्रत्युत्तर भाजपचे शहराध्यक्ष अजय गोंदावले यांनी आज येथे केला आहे.दरम्यान केसरकरांनी नेहमी खोटे बोलून अत्यंत जवळ असलेल्या प्रविण भोसले,बबन साळगावकर यांच्यासह शंकर कांबळी, शिवराम दळवी यांची राजकीय कारकीर्द संपवली,हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे त्यांनी अशा प्रकारे संपवण्याची भाषा करण्यापेक्षा किती कार्यकर्त्यांना तयार केले,कोणाचा संसार उभा केला?, याचे उत्तर द्यावे, असा टोलाही त्यांनी लगावला.
श्री.परब यांनी उद्यानात झालेल्या केलेल्या अपहाराच्या टीकेनंतर काल झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार केसरकर यांनी संजू परब यांना राजकीय अस्तित्व संपवेन,अशी तंबी दिली होती. याला शहराध्यक्ष अजय गोंदावले यांनी प्रत्युत्तर दिले आहे.