अवैध दारू वाहतूक प्रकरणी दोघांची जामिनावर मुक्तता…

86
2
Google search engine
Google search engine

दोडामार्ग ता.१४: अवैद्य दारू वाहतूक केल्याप्रकरणी दोघांची आज येथील न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली. राहुल कदम (रा.सोलापूर) व दीपक कडेकर (रा.पुणे),अशी संशयितांची नावे आहेत.याकामी आरोपींच्या वतीने ॲड.वैभव चव्हाण यांनी काम पाहिले.
याबाबत अधिक माहिती अशी की,११ ऑगस्टला ही कारवाई करण्यात आली होती.यावेळी त्यांच्याकडून २६ लाख ४० हजार रुपयांची दारू जप्त करण्यात आले होती.दरम्यान त्यांना येथील न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती.तर त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपताच आज पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले.यावेळी त्यांची न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली.