सावंतवाडी-शिरोडा रस्ता निरवडे येथे वाहतुकीसाठी धोकादायक…

121
2
Google search engine
Google search engine

सरपंच आंदोलनाच्या पावित्र्यात;चतुर्थीपूर्वी डागडुजीची मागणी…

सावंतवाडी,ता.२५: गोव्याकडे जाण्यासाठी पर्याय ठरणारा सावंतवाडी-शिरोडा हा राज्यमार्ग निरवडे येथे खड्डेमय बनला आहे.तर त्याठिकाणी एका महिलेचा अपघात होऊन गंभीर जखमी झाली आहे.त्यामुळे या रस्त्याची चतुर्थी पूर्वी तात्काळ डागडुजी करा,अन्यथा ग्रामस्थांना घेऊन रस्ता रोको आंदोलन केले जाईल,असा इशारा सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष तथा निरवडे सरपंच प्रमोद गावडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे.
दरम्यान हा रस्ता कळणे येथून रेडी येथे होणाऱ्या खनिज वाहतुकीसाठी वापरण्यात येत असल्यामुळे तो खड्डेमय बनला आहे.असा आरोप येथील ग्रामस्थांकडून होत आहे.त्यामुळे गणेश चतुर्थी पूर्वी या रस्त्याची डागडुजी करा, अन्यथा पंचक्रोशीतील ग्रामस्थांना घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा श्री गावडे यांनी यावेळी दिला आहे. या रस्त्यावर भलेमोठे खड्डे पडल्यामुळे वारंवार अपघात होत आहे. तर अनेक जण यात जखमी झाले आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ याची दखल घेत या रस्त्याची डागडुजी करावी,अशी मागणी यावेळी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.