अल्पवयीन मुलीला “व्हिडीओ व्हायरल” करण्याची धमकी…

3
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडीतील घटना; अज्ञात युवकांच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल…

सावंतवाडी,ता.२१: इन्स्टाग्रामवरुन अल्पवयीन मुलीशी मैत्रीकरुन तिचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देणार्‍या युवकाच्या विरोधात येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार दोन दिवसांपुर्वी उघड झाल्यानंतर संबधित मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार येथील पोलिस ठाण्यात “त्या” संशयित अज्ञात युवकाच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबधित मुलगी ही अल्पवयीन असून संशयिताने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून त्या मुलींशी ऑनलाईन मैत्री केली होती. त्यानंतर तिच्याशी चॅटिंग करुन तिला व्हीडीओ कॉल करण्याची गळ घातली होती. त्यानंतर कालातंराने तु माझ्याशी रोज चॅटिंग केले पाहीजे, नाहीतर तुुझे व्हीडीओ व्हायरल करेन, अशी धमकी दिली होती. दरम्यान झालेल्या प्रकारामुळे भेदरलेल्या त्या मुलीने येथिल पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार त्या अज्ञात संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.