बांदा केंद्रशाळेत चैतन्यमय वातावरणात शाळेचा पहिला दिवस…

3
2
Google search engine
Google search engine

बांदा,ता.०४: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले दिड वर्षाहून अधिक काळ बंद असलेल्या शाळा आज शासनाच्या आदेशान्वये इयत्ता पाचवी पासून सुरू झाल्या.या दिवसाची सुरवात बांदा केंद्रशाळेसह सर्वच शाळांमधून उत्साहवर्धक वातावरणात झाली.


बांंदा केंद्रशाळेमध्ये शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या स्वागतोत्सव कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर ,बांदा सरपंच अक्रम खान , विस्तार अधिकारी दुर्वा साळगांवकर ,केंद्रप्रमुख संदीप गवस,माजी सरपंच बाळा आकेरकर,सेवानिवृत्त शिक्षक अन्वर खान,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य उमेश तळवणेकर, सुनिल धामापूरकर,सुशिल देसाई,अनंत देसाई,भारती महाजन,दीपक बांदेकर आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शाळेत पाचवीत नव्यावे शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पायाचा ठसा उमटवून ‘पहिलं पाऊल’ हा ठसा देऊन स्वागत केले. या दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी नवोदय विद्यालयासाठी निवड झालेल्या युग्धा बांदेकर व मी शिक्षक होणार या जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रावीण्य प्राप्त कनिष्का केणी व दहावी बोर्ड परीक्षेत एक लाखाचे बक्षीस मिळवलेल्या शाळेची माजी विद्यार्थीनी तन्वी शितोळे व नवदुर्गा पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापिका सरोज नाईक ,सवित्रीबाई फुले योजनेतून दत्तक विद्यार्थीनी घेतलेल्या विस्तार अधिकारी दुर्वा साळगावकर यांचे अभिनंदन करण्यात आले.
यादिवशी बाळा आकेरकर व सुनील धामापूरकर यांनी विद्यार्थ्यांना मास्क व सॅनिटायझर याचे वाटप केले. यादिवशी सरपंच अक्रम खान व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर व उमेश तळवणेकर यांनी विद्यार्थ्यांना लाडू व पेढे याचे वाटप केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक श्री जे.डी.पाटील यांनी तर आभार मुख्याध्यापक सरोज नाईक यांनी मानले.
गेले अनेक दिवसांपासून बंद असलेली जिल्हा परिषदेची सर्वाधिक पटसंख्येची शाळा आज विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजून गेला होता. अनेक महिन्यापासून बंद असलेल्या शाळा सुरु झाल्याने विद्यार्थी शिक्षक व पालकांचा आनंद ओसांडून वाहत होता.यावेळी कोरोना विषयक घोषणांचे विद्यार्थ्यांच्या हाती दिलेले पोस्टर्स लक्षवेधी ठवले होते.