बचत गटांनी शासनाच्या उपक्रमांचा पुरेपूर लाभ घ्यावा…

3
2
Google search engine
Google search engine

अक्षता डाफळे; वैभववाडी येथे दिवाळी बाजार चे उद्घाटन…

 

वैभववाडी, ता.०१: स्थानिक महिला बचत गटांनी बनविलेल्या खाद्यपदार्थांना हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून दिवाळी बाजार हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सणासुदीत हा बाजार सुरू झाल्याने निश्चितच महिला गटांना प्रोत्साहन मिळणार आहे. त्यांच्या कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होणार आहे. या बाजाराला ग्राहकांनी अवश्य भेट द्यावी असे आवाहन पं. स. सभापती अक्षता डाफळे यांनी केले आहे.

वैभववाडी पंचायत समिती व राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्यावतीने येथील बाजारपेठेत दिवाळी बाजार ही संकल्पना राबविण्यात आली आहे. या बाजाराचे उद्घाटन अक्षता डाफळे व उपसभापती अरविंद रावराणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, एडगांव सोसायटीचे संचालक सुनील रावराणे, कोकिसरे ग्रा.पं. सदस्य प्रदीप नारकर, दाजी पाटणकर, बंधू वळंजू, सुनील रावराणे, शांताराम गराटे, प्रभाग समन्वयक विनायक सावंत, प्रदीप चव्हाण, संजय वानखेडे व बचत गट महिला प्रतिनीधी उपस्थित होते.

यावेळी अरविंद रावराणे म्हणाले, दिवाळी बाजार सुरू होत असलेली जागा व इमारत ही जिल्हा परिषद मालकीची आहे. ही मोक्याची जागा जास्तीत जास्त वापरात कशी येईल. व ती इमारत सुसज्ज करण्यासाठी आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील. उपक्रम राबवून बचत गटांनी आर्थिक प्रगती साधावी असे सांगितले.

गटविकास अधिकारी श्री. परब म्हणाले, या संकल्पनेतून खऱ्या अर्थाने महिला बचत गटांना आर्थिक आधार मिळणार आहे. खाद्यपदार्थ दर्जेदार असल्याने आरोग्यासाठी निश्चितच हे चांगले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेब हे लघु व सुक्ष्म व मध्यम उद्योगमंत्री आहेत. निश्चितच त्यांच्यामुळे जिल्ह्यात रोजगाराला चालना मिळणार आहे. लघु उद्योग उभे राहणार आहेत. उद्योजकांना फायदा होणार आहे. बचत गटांनी देखील याचा फायदा घ्यावा असे सांगितले. या दिवाळी बाजारात पहिल्या दिवशी अनेक महिला बचत गटांनी आपले स्टॉल लावले आहेत. ग्राहकही या स्टॉलला भेट देऊन खरेदी करत आहेत.