शेतकऱ्यांची असलेल्या जिल्हा बँकेची बिल्डरांना मदत…

2
2
Google search engine
Google search engine

 

परशुराम उपरकरांचा आरोप ; प्रतिभा डेअरीवर गुन्हा का नाही…?

कणकवली, ता.११ : सिंधुदुर्ग जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक असून देखील बिल्डरांना मदत करते हे ऑडिट रिपोर्ट मध्ये आले असल्याचा आरोप उपरकर यांनी आज केला. तसेच वेळ आल्यावर हे दाखवून देऊ, असा इशाराही त्यांनी दिला. प्रतिभा ने पैसे थकवले मग जिल्हा दुग्ध संघ प्रतिभा डेअरी वर गुन्हा का दाखल करत नाही? दूध संघ मूग गिळून गप्प का? असा सवालही त्यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालयात श्री.उपरकर बोलत होते. यावेळी यांच्यासोबत वैभववाडी तालुकाध्यक्ष सचिन तावडे, मनविसे चे अमित इब्रामपूरकर, अनिल राणे उपस्थित होते.
ते म्हणाले, जिल्हा बँक निवडणूक तोंडावर आल्या नंतर जिल्हा बँक अध्यक्ष व दूध संघाच्या अध्यक्षांना शेतकऱ्यांची आठवण झाली हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने दुर्दैवी आहे. जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत व दूध संघाचे अध्यक्ष एम के गावडे यांनी आता आयोजित केलेली संयुक्त बैठक गेल्या चार वर्षात का केली नाही?
उपरकर पुढे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान यांनी केले असा आरोप त्यांनी केला. कारण मंत्री असताना नारायण राणेंनी उभारलेली ४ कोटींची डेअरी बंद पाडून यांनी सिंधुदुर्गात गोकुळ ला आणले. त्यावेळी गोकुळच्या माध्यमातुन दुग्धोत्पादक शेतकऱ्यांकरिता वेगवेगळ्या ६० योजना राबवणार असे गोकुळ ने सांगितले होते. त्यावेळी आताचे जिल्हा बँक अध्यक्ष असलेले सतीश सावंत, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी शासकीय डेअरीला दूध देऊ नका गोकुळ दूध द्या याकरिता प्रयत्न केले व शेतकऱ्यांना आवाहन देखील केले होते. त्यावेळी गोकुळ ने ज्या योजना राबवणार असे सांगितले त्याचा लाभ शेतकऱ्यांना झालाच नाही असा आरोप उपरकर यांनी केला. गोकुळ च्या माध्यमातून सध्या संस्थांना वाहतुकीतील १०० मि. ली. दूध कमी दाखवून संस्था व शेतकरी यांची छळवणूक सुरू असल्याचा आरोप उपरकर यांनी केला. गेल्या ५ वर्षात गोकुळ ला दूध देऊ नका असे सांगत जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, व भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनीच प्रतिभा डेअरी आणली व प्रतिभा डेअरीला ला दूध द्या असा आग्रह केला. आता बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दुग्धोत्पादक शेतकऱ्यांसाठी आम्ही काही तरी करतो दाखवण्याचे प्रयत्न, सुरू असल्याची टीका श्री उपरकर यांनी केली.
राज्यमंत्री बंटी पाटील यांची भेट घेत शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. प्रतिभा कडून थकित असलेले २ कोटी ६५ लाख देऊया असे दूध संघ अध्यक्ष यांनी सांगितले. मात्र त्याचे काय झाले हा प्रश्न शेतकऱ्यांनी होणाऱ्या बैठकीत उपस्थित केला पाहिजे. शेतकऱ्यांचे थकित असलेले पैसे गोकुळ व प्रतिभा डेरी केव्हा देणार, गोकुळ च्या योजना कुठे, असा सवाल दुग्धोत्पादक शेतकर्‍यांमधून उपस्थित केला जात असून, हे प्रश्न होणाऱ्या बैठकीदरम्यान शेतकऱ्यांनी विचारण्याची गरज आहे. अशी आश्‍वासने मिळत असतील व ती पूर्ण होत असतील तर तर दरवर्षी जिल्हा बँकेच्या निवडणुका व्हायला हव्यात असेही श्री.उपरकर म्हणाले.