सावंतवाडी राष्ट्रवादीकडून खासदार सुप्रिया सुळे यांचे कुडाळात स्वागत…

0
2
Google search engine
Google search engine

कुडाळ ता.१७: राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे सावंतवाडी राष्ट्रवादीच्या वतीने कुडाळ येथे जल्लोषी स्वागत करण्यात आले. याप्रसंगी सावंतवाडी विधानसभा अध्यक्ष अर्चना घारे-परब व तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी त्यांना पुष्पगुच्छ दिला. सौ. सुळे यांच्यासह राष्ट्रवादी युवती काँग्रेस मुंबई प्रदेशाध्यक्ष अदिती नलावडे आज ज़िल्हा दौऱ्यावर आले आहेत.

यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, राष्ट्रवादी नेते व्हिक्टर डाॅंटस, जिल्हाध्यक्ष अमित सामंत, महिला उद्योग व व्यापार जिल्हाध्यक्ष दर्शना बाबर-देसाई आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.