संत संताजी जगनाडे महाराजांचे कार्य महान, तेली समाजाने त्यांचे आचरण करावे…

3
2
Google search engine
Google search engine

सुप्रिया वालावलकर; ओरोस येथे तेली समाज संघटनेकडून जयंती साजरी…

ओरोस,ता.०८: संत संताजी जगनाडे महाराजांचे कार्य महान आहे. तेली समाजाने त्यांच्या कार्याचे आणि कामाचे आचरण करून आपली उन्नती साधावी, विविध समाजपयोगी उपक्रम राबवून समाज संघटीत करावा. असे प्रतिपादन पंचायत समिती सदस्य सुप्रिया वालावलकर यांनी केले

 

ओरोस येथील इच्छापूर्ती मंगल कार्यालयात तेली समाज संघटनेच्या वतीने संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती निमित्त कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी प. सदस्य सुप्रिया वालावलकर, कुडाळ तालुका अध्यक्ष दिलीप तिवरेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि संत संताजी जगनाडे महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात केली व उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

 

संताजी जगनाडे महाराजाच्या कार्याला उजाळा देत गावातील प्रत्येक तेली समाज बांधवांनी संघटित झाले पाहिजे असे सचिव अमित धामापूरकर यांनी प्रास्ताविकात विशद केले .

प स. सदस्य सुप्रिया वालावलकर म्हणाल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेली समाज बांधव संघटित आहे. संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती कार्यक्रमा निमित्त आपण सर्व समाज बांधव एकत्र आलो आहोत. संताजी जगनाडे महाराजांच्या कार्याबाबत प्रत्येक समाज बांधवांनी आचरण केले पाहिजे. त्यांच्या कार्याचा प्रत्येक तेली समाज बांधवांच्या घरापर्यंत ठसा उमटावा या दृष्टीने संघटितपणे कार्य करूया.

कुडाळ तालुका तेली समाज संघटनेचे अध्यक्ष दिलीप तिवरेकर यानी, गेल्या काही वर्षातील तेली समाज संघटनेच्या कामाचा आणि विविध उपक्रमांना उजाळा देत तालुक्यातील तेली समाज बांधव संघटित आहे. परंतु ही सघटना अधीक मजबुत करण्यासाठी प्रत्येक गावातील समाज बांधवांसाठी एकत्रित मेळावा लवकरच आयोजित करावा. समाजाबद्दल प्रेमभावना व समाजातील अनेक व्यक्ती आज विविध पदावर संघटनेच्या माध्यमातूनही कार्यरत आहेत अशा समाज बांधवांना शुभेच्छादेण्यासाठी एकत्र येऊया, संत संताजी जगनाडे महाराज यांची आज जयंती आहे .जगनाडे महाराजांचे कार्य महान आहे. त्याचे प्रत्येक तेली समाज बांधवांनी आचरण केले पाहिजे. समाजाबद्दल कोणी वाईट हेतूने बोलणार नाही. अरे ला का रे उत्तर देण्यासाठी संघटित झाले पाहिजे. कुडाळ तालुक्यात विखुरलेला समाज एकत्रित व्हावा या दृष्टीने लवकरच कुडाळ तालुक्यातील गावा गावातील सर्वेक्षण आणि तालुका मेळावा घेण्याबाबत चे नियोजन केले जाईल त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे सांगितले.

सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज जिल्हा उपाध्यक्ष साई आंबेरकर यांनी जिल्ह्यातील तेली समाज बांधवांच्या कामाचा व विविध क्षेत्रात कार्यरत व्यक्ती आणि विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम जिल्हा संघटनेच्या माध्यमातून दरवर्षी घेतला जातो. तसेच तेली समाज संघटनेचा वधू वर मेळावा आयोजित करून वधु-वरांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेली समाज बांधव संघटित असून जिल्ह्यात परप्रांतीय परजिल्ह्यातील तेली बांधव या जिल्ह्यात कार्यरत आहेत जिल्ह्यातील तेली समाजाच्या बरोबर अन्य जिल्ह्यातील व परप्रांतातील तेली समाज बांधवांना एकत्रित करण्यासाठी परप्रांतीय तेली समाज सर्वेक्षण काम हाती घेणे गरजेचे आहे त्यादृष्टीने प्रयत्न करावे. असे सूचित केले.

प्रारंभी तालुक्यातील दिवंगत ज्ञात-अज्ञात व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली .आजच्या या कार्यक्रमाला भालचंद्र आजगावकर , बाव बांबुळी सरपंच वसंत तेली, संदीप तेली ,लक्ष्मी आरोंदेकर, गणेश बांदेकर ,संतोष वालावलकर आदींसह तेली समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी उपस्थितांचे आभार मानण्यात आले.