मालवण- कुपेरीच्या घाटीत पर्यटकांच्या गाडीला अपघात…

2347
2
Google search engine
Google search engine
Google search engine

पहाटे साडे पाचची घटना ; सुदैवाने जीवितहानी टळली, जखमींना जिल्हा रुग्णालयात हलविले…

मालवण, ता. २० : पर्यटनाचा आनंद लुटून माघारी परतणाऱ्या धुळे येथील पर्यटकांच्या गाडीचा कुपेरीच्या घाटीत अपघात झाला. ही घटना आज पहाटे साडे पाच वाजण्याच्या सुमारास घडली. गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. जखमींना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
धुळे येथील पर्यटक मालवणची पर्यटन सफर करून पहाटे माघारी निघाले होते. यात कुपेरीच्या घाटीत वळणाच्या रस्त्यावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी रस्त्यालगतच्या गटारात जाऊन अपघात झाला. या अपघातामुळे गाडीतील सर्व पर्यटक आतच अडकून पडले होते. या मार्गावरून जाणाऱ्या अन्य वाहन चालकांनी तसेच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत गाडीत अडकलेल्या पर्यटकाना बाहेर काढले. यात जखमी झालेल्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. अपघातात गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते.

\